राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने पूर्वीच मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेल्या ९८ अंगणवाडी व ७४५ मिनी अंगणवाडी केंद्रे सुरु करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहितीही ड. यशोमती ठाकूर यांनी दिली. केंद्र शासनाने पूर्वीच मान्यता देऊनही ही अंगणवाडी केंद्रे अद्याप सुरु करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. तेव्हा ही केंद्रे सुरु करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना मंत्री ठाकूर यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार राज्याच्या विविध भागात या नव्या अंगणवाड्या लवकरच सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
९८ अंगणवाडी आणि ७४५ मिनी अंगणवाडीही सुरु होणार