सेव्ह दिवा फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर

ठाणे : सेव्ह दिवा फाऊंडेशन वतीने देण्यात येणाऱ्या कोकनरत्न पुरस्कार, जीवनगौरव, कोकण पत्रकार भूषण, दिवारत्न आणि समाजभूषण पुरस्कारांची घोषणा फाऊंडेशनचे सर्वेसर्वा रोहिदास मुंडे यांनी नुकतीच केली. दिवा येथे २४ ते २६ जानेवारी दरम्यान पार पडणाऱ्या अखंड कोकण महोत्सवात पहिल्या दिवशी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.


सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना ‘कोकन रत्न', माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांना 'जीवनगौरव' आणि पत्रकारितेतील योगदानाबाबत दैनिक सागरचे ठाणे-मुंबई आवृत्ती संपादक - नितीन हासे यांना कोकण पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पावसाळ्यात दिव्यातील पुरामध्ये विशेष आरोग्य सेवा पुरविणाऱ्या व शेकडो मोफत आरोग्य शिबीर घेऊन दिवावासीयांची आरोग्य सेवा करणाऱ्या डॉ. कुलदीप महाजन यांना दिवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. बाबा रामदेव शिक्षण संस्थेचे दिवा अध्यक्ष किरण जाधव यांना व त्यांच्या संस्थेला सामाजिक कार्याबाबत सन्मानित करण्यात येणार आहे. समाजभूषण म्हणून गजानन पाटील यांचा तर उत्कृष्ट रेल्वे अभ्यासक म्हणून अमोल कदम यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या बरोबर दिव्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक मान्यवरांना गौरविण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.