म हाराष्ट्रात अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी आणि त्या आघाडीची मध्यस्थी करून सर्वाधिक प्रयत्न आणि बैठका या संजय राऊत यांनीच केल्या. त्यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी र आणि तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या विचारांचे । आदान-प्रदान करण्याची महत्वाची भूमिका संजय गफनांनीच निभावली टपीकले महाविकास आघाडीचा सारथी संजय राऊत ठरले आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. पण आज संजय राऊत हे मस्त मौला असल्यासारखे परखड बोलण्याची संधी सोडलेनासे झाले. राऊत साहेब, तीन इंचाची जीभ चार माणसात बसवते आणि उठविते. पत्रकार आणि प्रसारमाध्यमांशी निगडित असलेले संजय राऊत यांनी परखड भूमिका सामनामधून आणि प्रत्यक्षात जाहीरपणे यात साम्य नाही. सामानातून लाखो आणि जाहीरपणे वक्तव्य हे करोडो असा विरोधाभास आहे. हे लक्षात घेणं गरजेचे आहे. अन महाराष्ट्रात सरकार हे त्यांनीच अस्तित्वात आणलेले महाविकास आघाडीचे सरकार आहे. या महाविकास आघाडीत काँग्रेस, । राष्ट्रवादी आणि शिवसेना हे घटक पक्ष आहेत. आज महाराष्ट्राचा कारभार हा खऱ्या अथान सुरु झालाय. तेव्हा महाविकास आघाडी टिकवायची असेल तर राऊत यांना आवरणे गरजेचे आहे. राऊत साहेब, नवा खड्डा खोदा, विरोधकांना कोंडीत पकडा, मात्र तुम्ही तर आम्ही चुकीचे आहोत आम्हालाच पकडा असा संदेश आपल्या वक्तव्यावरून सांगत आहेत, राऊत साहेब हे परखड वक्तव्य नाही. तर शेखचिल्ली सारखा प्रकार आहे याची गंभीर दाखल घ्यावी. आता कोण काय होते हे तुम्ही बोलू नका शिवसेनेला पक्ष प्रमुख आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहे. हे लक्षात घ्यावे. इमारत उभी करण्याचे श्रेय घेतले आता तिला तुम्हीच तिला पडण्याची भूमिका घेऊ नका. कारण सरकार पडणे हे राजकारणालाही आणि लोकांनाही परवडणारे नाही. शेखचिल्ली प्रमाणे सत्तेच्याच दोऱ्या कापू नका असे सागावेसे वाटते आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आज भाजपच्या नेत्यांना आणि माजी मुख्यमंत्र्यांना मित्र पक्षांवर टीकेची संधी स्वतः संजय राऊत देत आहेत. इंदिरा गांधी आज हयात नसताना त्यांच्याबाबत चांगले बोलता आलं नाही तर वाईटही बोलू नये. कारण त्या आज नाहीत. अन काँग्रेस मित्र पक्ष आहे. महत्वाची भूमिका राजकारणात आणि सरकारमध्ये काँग्रेसची आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तेव्हा राऊत यांची वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटते. प्रसारमाध्यमे राऊतांना बोलते करतात आणि राऊत कुठलेही भान ठेवता बोलते होतात हीच आश्चर्याची गोष्ट आहेमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे स्टेपनी आहे असे वक्तव्य संयमी माणसालाही जागे करण्यासारखे आहे. एकीकडे पवार साहेबांचे समर्थन करता दुसरीकडं अजितदादा यांच्यावर तोफ डागता हे सर्व प्रकार शेखचिली सारखाच असल्याचे चित्र दिसते. आज परिस्थिती विपरीत आहे. कारण सरकार आणि सत्ता यावर महाराष्ट्रातील जनता आधारित आहे. इमारतीला सुरुंग लावण्याचे काम किमान संजय राऊत यांच्याकडून तरी महाराष्ट्राला अपेक्षित नाही..
महाविकास आघाडी टिकवायची... तर राऊताना आवरा.