राष्ट्रध्वजाचा या पण सारे भारतीय २६ जानेवारी असो किंवा १५ ऑगस्ट या स्वातंत्रदिनी व प्रजासत्ताकदिनी संपूर्ण भारतभर अगदी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत, गावपातळीवर, शासकीय सार्वजनिक ठिकाणी वाचकाचे एकदम धुमधडाक्यात, उत्सवात पत्र झेंडावंदन होते राष्ट्रध्वजाला सलाम केला जातो. यादिवशी सार्वजनिक ठिकाणी झेंडावंदन करतो. पण त्याच बरोबर सायकल, मोटार सायकल, रिक्षा, कार, टेम्पो यावर छोटे प्लास्टिकचे झेंडे, स्टीकर लावले जातात. गाडीवर, वाहनावर अगदी शर्टाच्या खिशावर, छातीवर छोटे तिरंग्याचे स्टीकर लावले जातात. म्हणजे स्वातंत्रदिनी व प्रजासत्ताकदिनी हा राष्ट्रध्वज आपण सारे डोक्यावर घेतो. पण दुसऱ्याच दिवशी हे छोटे प्लास्टिकचे झेंडे, स्टीकर, कागदी साहित्य रस्त्यावर, कचऱ्यात, गटारात पडलेले दिसतात. हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. शक्यतो प्लास्टिकचे छोटे झेंडे, स्टीकर वापरण्यापेक्षा कागदी छोटे झेंडे, स्टीकर कागदी साहित्याचा वापर करावा व त्याच बरोबर हे कागदी झेंडे, स्टीकर कचऱ्यात, गटारात पडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. कारण या राष्ट्रध्वजाची, तिरंग्याची ‘शान कभी न जाने पाऐ, चाहे जान भले ही जाये'. या तिरंग्याची शान दाखविण्यासाठी लाखो जवान कुर्बान, शहीद झाले आहेत. त्या राष्ट्रध्वज, तिरंग्याचा सन्मान राखणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. या राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे आपल्याच हाती आहे. -
मनोहर महादेव दातार सिध्देश्वर तलाव, खोपट, ठाणे (प) ८६५२४९१७९६